<$BlogRSDUrl$>

गुरुवार, अप्रैल 08, 2004

बघा काय आठवतं का... 

लहाणपणी जेव्हा केबल टीव्ही काय असतं हे माहीत नव्हतं, त्या दिवसांमध्ये आपल्या एकुलत्या एक दुरचिञवाणिवर एक खास ऱाष्ट्रीय एकात्मतेविषयक छोटी जाहीरात दाखवत असत. मला तर ऱाष्ट्रीय एकात्मतेसोबत माझं बालपणसुद्धा आठवलं, बघा तुम्हाला काय आठवतं का?
http://mmslb.eonstreams.com/recreate/cdaudio/wm/1194_ek_anek_aur_ekta_56k.wmv

टिपू सुलतानची तलवार पुन्हा भारतात... 

म्हैसूरचा वाघ म्हणुन ओळखल्या जाणारया टिपू सुलतानची प्रसिद्ध तलवार मद्दनिर्मितीमधील उद्योजक विजय मल्ल्या यांनी एक कोटी रुपये खर्च करुन, लंडनमध्ये एका लिलावात खरेदी केली...पण राज्यकारण्यांच्या नाकर्तेपणामुळे छत्रपती शिवाजी महाराजांची, खुद्द भवानी मातेने दिलेली तलवार लंडनच्या वस्तुसंग्रहालयात मायदेशी परतण्याची वाट बघत आहे, उभ्या महाराष्ट्रात तिला कोणीही वाली नाही. शिवरायांच्या नावाचा फक्त राजकीय वापर करणारे जर हे वाचत असतील तर त्यांना एकच आवाहन करु ईच्छितो की ही महाराष्ट्राची अस्मिता परत मिळालीच पाहीजे. एक सामान्य नागरीक म्हणून मी फक्त ही अपेक्षा बाळगु शकतो पण सत्तेच्या ताकदीने ही सामान्य नागरीकांची सामान्य मागणी पुर्ण करणे जर एकाही राजकारण्याला किंवा राजकीय पक्षाला शक्य नसेल तर त्याला किंवा त्या पक्षांना या जनतेकडुन मत मागण्याचा काडीमात्रही नैतिक अधिकार नाही.

ह्या राजकारण्यांचा धिक्कार असो...

This page is powered by Blogger. Isn't yours?