<$BlogRSDUrl$>

शनिवार, मार्च 20, 2004

६४ कला... 

खुपवेळा ऍकलं आहे की मानवी जिवनात एकूण ६४ कला आहेत पण बराच शोध केल्यानंतरही ६३ कलांची नांव शोधु शकलो (त्यांचे अर्थ अजुनही पूर्णपणे समजायचे आहेत.) . माझ्यासारखे अजुन जे कोणी ह्या कलांची नांव जाणु ईच्छितात त्यांसाठी खांस बनवलेली ही यादी...

१.इतिहास,
२.आगम,
३.काव्य,
४.अलंकार,
५.नाटक,
६.गायकत्व,
७.कवित्व,
८.कामशास्त्र,
९.दुरोदर,
१०.देशभाषालिपीद्मान,
११.लिपीकर्म,
१२.वाचन,
१३.गणक,
१४.व्यवहार,
१५.स्वरशास्त्र,
१६.शाकुन,
१७.सामुद्रिक,
१८.रत्नशास्त्र,
१९.गजअश्वरथ कौशल,
२०.मल्लशास्त्र,
२१.सूपशास्त्र,
२२.भरूहदो हद(बागायत),
२३.गंधवाद,
२४.धातूवाद,
२५.रससंबधीखनिवाद,
२६.बिलवाद,
२७.अग्निसंस्तंभ्य,
२८.जलसंस्तंभ्य,
२९.वायुस्तंभन,
३०.वशीकरण,
३१.आकर्षण,
३२.मोहन,
३३.विद्वेशण,
३४.ऊच्चाटण,
३५.मारण,
३६.कलावंचन,
३७.परकायाप्रवेश,
३८.पादुकासिद्धी,
३९.वाकसिद्धी,
४०.गुटिकासिद्धी,
४१.ऐन्द्रजालिक,
४२.अंजन,
४३.परदृष्टिवंचन,
४४.स्वरवंचन,
४५.मणिभूमिकर्म,
४६.मंत्रऔषधींची सिद्धी,
४७.चोरकर्म,
४८.चित्रक्रिया,
४९.लोहक्रिया,
५०.अश्मक्रिया,
५१.मृत्क्रिया,
५२.दासक्रिया,
५३.वेणुक्रिया,
५४.चर्मक्रिया,
५५.अम्बरक्रिया,
५६.अदृश्यकिरण,
५७.दन्तिकरण,
५८.मृगयविधी,
५९.वाणिज्य,
६०.पाशुपल्य,
६१.कृषी,
६२.आसवकर्म,
६३.लावकुक्कुट मेषादियुद्दकारक कौशल.
६४.?????

सध्यातरी फक्त कलांची यादी आहे अर्थ समजताच तेसुद्धा दर्शविन्यात येतील.
वरील यादीत जर चुका असतील कृपया दुरुस्त करण्यास आपल्या सुचना देऊन मदत करावी...

शनिवार, मार्च 13, 2004

हुररररर्रे पहिला एकदिवसीय सामना भारताने जिंकला... 

हुरररररर्रे अतिशय चुरशीच्या आणि शेवटच्या चेंडुपर्यंत रंगलेला भारत आणि पाकिस्तान यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना भारताने ६ धावानी जिंकला.

शुक्रवार, मार्च 12, 2004

दुटप्पी राजकारण्यांचा धिक्कार असो... 

भारत आणि पाकिस्तानं यांच्यातील पहिला एकदिवसीय क्रिकेट सामना सुरु झाला खरं पण त्याआधी घडलेल्या घटनांकडे जर एक नजर टाकली तर एक बाब लक्षात येते आणि ती म्हणजे आपल्या राजकारणी लोकांचा दुटप्पीपणा.एकीकडे परदेशी व्य़क्तीने पंतप्रधान होउ नये म्हणुन जिवाचा आटापिटा करतात पण एक परदेशी क्रिडावाहीनी(टेन स्पोर्टस्) जेव्हा मनमानी करु लागते तेव्हा हेच लोक कोर्टाचा निकाल ऐईपर्यंत वाट बघत बसतात. आपल्या देशात एवढे क्रिकेट रसिक असुनही हे राजकारणी लोक आपला फायद्यासाठी (क्रिडावाहीनीक़डुन मिळणारा पैसा), सामान्य जनहिताचा विचार कधी करतच नाहीत... हे फिल गुड म्हणायचं की फील as if you are feeling good.
माझ्या मते सरकारने अशा प्रकारे हुकुमशाही गाजवु पाहणारया क्रिडावाहीनीवर बंदी घालण्याची भिती घालावी.

गुरुवार, मार्च 04, 2004

॥ भातुकलीच्या खेळामधलीं राजा आणिक राणी ॥ 

प्रत्येक मराठी मनाने किमान एकदा तरी ऐकलं असेल असं, गायक अरुण दाते यांच सुप्रसिद्ब मराठी गीत खास मराठी रसिकांसाठी...
**************
गायक: अरुण दाते
गीत: मंगेश पाडगांवकर
संगीत: यशवंत देव
**************

भातुकलीच्या खेळामधलीं राजा आणिक राणी,
अर्ध्यावरती डाव मोडला अधुरी एक कहाणी ॥ धृ. ॥

राजा वदला, "मला समजली शब्दावाचुन भाषा,
माझा नशिबासवें बोलती तुझ्या हातच्या रेषा"
कां राणीच्या डोळां तेव्हां दाटुनि आलें पाणी? ॥ १ ॥

राणी वदली बघत एकटक दूरदूरचा तारा
"उद्यां पहाटे दुसर्‍या वाटा, दुज्या गांवचा वारा"
पण राजाला उशिरां कळली गूढ अटळ ही वाणी ॥ २ ॥

तिला विचारी राजा, "कां हे जीव असे जोडावे?
कां दैवानें फुलण्याआधीं फूल असें तोडावें?"
या प्रश्णाला उत्तर नव्हतें, राणी केविलवाणी ॥ ३ ॥

कां राणीनें मिटले डोळे दूर दूर जातांना,
कां राजाचा श्वास कोंडला गीत तिचें गातांना
वार्‍यावरती विरून गेली एक उदास विराणी ॥ ४ ॥

This page is powered by Blogger. Isn't yours?