<$BlogRSDUrl$>

शनिवार, नवंबर 19, 2005

पुन्हा एकदा असा मि... 

 Posted by Picasa

मंगलवार, जुलाई 12, 2005

सीतेचं एकमेव मंदिर. 

लंका म्हटली की रावण आणि प्रभु रामचंद्र लगेच आठवतातच, पण ह्याच लंकेत फक्त सीतामाईच असं जगातलं एकमेव मंदिर आहे, अधिक माहितीसाठी लोकसत्तामध्ये प्रसिद्ध झालेला खालील लेख जरुर वाचा...

http://www.loksatta.com/lokprabha/20050715/lpsansakriti.htm

मंगलवार, जुलाई 05, 2005

भर ऊन्हात पाऊस घेऊन, आभाळ मनात दाटतं... 

"ऊन जरा जास्त आहे,
दरवर्षी वाटंत...
भर ऊन्हात पाऊस घेऊन,
आभाळ मनात दाटतं."

आठवतात का हे शव्द...काही वर्षापुर्वी सौमिञच्या ह्या ओळीनी पावसाची मजा खरंच वाढवली होती, गारवाची गाणी आजही तोच गारवा देतात. ते दिवस आठवले की खरचं मन कसं प्रसंन्न होतं, पाऊस ह्या शब्दामध्येच ति जादु आहे की त्याच्या नुसत्या ऊच्चाराने ञासलेलं मन प्रफुल्लित होतं. ह्यावर्षी बॅंगलोरला आलो आणि प्रथमच मुंबईच्या पावसाला मुकलो, विशेषत पहिल्या पावसाला. मुंबईच्या पावसाची बातच काही और आहे. गटारं तुंबुन रस्ते बंद होणं, रेल्वे वाहतुक विस्कळित होणं आणि शाळेला सुट्टी मिळणं ह्या सारखं स्वर्गिय सुख बालगोपाळांना हवंहवंस असतं. मिञानां घेऊन लोणावळा, खोपोली आणि तुंगारेश्वरसारख्या ठिकाणी मजा लुटायला जाणं ह्याची तर जवान मंडळी चातकापेक्षा जास्त वाट बघत बसलेले असतात. प्रेमात गुंग जोडप्यांच्या कल्पनांबद्दल तर काय विचारायला नको, प्रत्येकाच्या वेगळ्या वेगळ्या रम्य आणि मनोहर कल्पना. ह्या सगळ्यात आजी-आजोबांना काळजी कसली तर नातवंड पावसात भिजुन आजारी पडु नयेत ह्याची.

पावसाबद्दल लिहिणारा मि काही पहिला नाही, बरीच लेखक, साहित्यिक आणि कवी मंडळी ह्यावर लिहुन गेली आहेत. माझं ह्यावर लिखाण करायचं कारण, गेला संपुर्ण आठवडाभर ई-पेपरमध्ये वाचतो आहे, घरी फोन केला तेव्हाही तेच कानावर पडलं की तुफानी पाऊस पडतो आहे. सुंदर, सुखावह, नयनरम्य अश्या ना ना छटा दाखवणारा पाऊस काही प्रदेशात माञ कहर करतो. पण असो नाण्याच्या दोन बाजु असतात त्यामुळे फक्त पावसाचं भयंकर रुप बघता बघता मला त्याच सौंर्दय नजरेआड करणं जमणार नाही.

ह्यावर्षी मुंबईचा पाऊस माञ मि खरंच मिस करतो आहे.

सोमवार, जुलाई 04, 2005

सरळ सोपी लोकशाही... 

जर कुणाला लोकशाही खरोखर समजुन घ्यायची असेल तर ह्याहून सोप ऊदाहरण कोणी देऊ शकत नाही...

रविवार, जुलाई 03, 2005

असा मि... 


गुरुवार, अप्रैल 08, 2004

बघा काय आठवतं का... 

लहाणपणी जेव्हा केबल टीव्ही काय असतं हे माहीत नव्हतं, त्या दिवसांमध्ये आपल्या एकुलत्या एक दुरचिञवाणिवर एक खास ऱाष्ट्रीय एकात्मतेविषयक छोटी जाहीरात दाखवत असत. मला तर ऱाष्ट्रीय एकात्मतेसोबत माझं बालपणसुद्धा आठवलं, बघा तुम्हाला काय आठवतं का?
http://mmslb.eonstreams.com/recreate/cdaudio/wm/1194_ek_anek_aur_ekta_56k.wmv

टिपू सुलतानची तलवार पुन्हा भारतात... 

म्हैसूरचा वाघ म्हणुन ओळखल्या जाणारया टिपू सुलतानची प्रसिद्ध तलवार मद्दनिर्मितीमधील उद्योजक विजय मल्ल्या यांनी एक कोटी रुपये खर्च करुन, लंडनमध्ये एका लिलावात खरेदी केली...पण राज्यकारण्यांच्या नाकर्तेपणामुळे छत्रपती शिवाजी महाराजांची, खुद्द भवानी मातेने दिलेली तलवार लंडनच्या वस्तुसंग्रहालयात मायदेशी परतण्याची वाट बघत आहे, उभ्या महाराष्ट्रात तिला कोणीही वाली नाही. शिवरायांच्या नावाचा फक्त राजकीय वापर करणारे जर हे वाचत असतील तर त्यांना एकच आवाहन करु ईच्छितो की ही महाराष्ट्राची अस्मिता परत मिळालीच पाहीजे. एक सामान्य नागरीक म्हणून मी फक्त ही अपेक्षा बाळगु शकतो पण सत्तेच्या ताकदीने ही सामान्य नागरीकांची सामान्य मागणी पुर्ण करणे जर एकाही राजकारण्याला किंवा राजकीय पक्षाला शक्य नसेल तर त्याला किंवा त्या पक्षांना या जनतेकडुन मत मागण्याचा काडीमात्रही नैतिक अधिकार नाही.

ह्या राजकारण्यांचा धिक्कार असो...

शनिवार, मार्च 20, 2004

६४ कला... 

खुपवेळा ऍकलं आहे की मानवी जिवनात एकूण ६४ कला आहेत पण बराच शोध केल्यानंतरही ६३ कलांची नांव शोधु शकलो (त्यांचे अर्थ अजुनही पूर्णपणे समजायचे आहेत.) . माझ्यासारखे अजुन जे कोणी ह्या कलांची नांव जाणु ईच्छितात त्यांसाठी खांस बनवलेली ही यादी...

१.इतिहास,
२.आगम,
३.काव्य,
४.अलंकार,
५.नाटक,
६.गायकत्व,
७.कवित्व,
८.कामशास्त्र,
९.दुरोदर,
१०.देशभाषालिपीद्मान,
११.लिपीकर्म,
१२.वाचन,
१३.गणक,
१४.व्यवहार,
१५.स्वरशास्त्र,
१६.शाकुन,
१७.सामुद्रिक,
१८.रत्नशास्त्र,
१९.गजअश्वरथ कौशल,
२०.मल्लशास्त्र,
२१.सूपशास्त्र,
२२.भरूहदो हद(बागायत),
२३.गंधवाद,
२४.धातूवाद,
२५.रससंबधीखनिवाद,
२६.बिलवाद,
२७.अग्निसंस्तंभ्य,
२८.जलसंस्तंभ्य,
२९.वायुस्तंभन,
३०.वशीकरण,
३१.आकर्षण,
३२.मोहन,
३३.विद्वेशण,
३४.ऊच्चाटण,
३५.मारण,
३६.कलावंचन,
३७.परकायाप्रवेश,
३८.पादुकासिद्धी,
३९.वाकसिद्धी,
४०.गुटिकासिद्धी,
४१.ऐन्द्रजालिक,
४२.अंजन,
४३.परदृष्टिवंचन,
४४.स्वरवंचन,
४५.मणिभूमिकर्म,
४६.मंत्रऔषधींची सिद्धी,
४७.चोरकर्म,
४८.चित्रक्रिया,
४९.लोहक्रिया,
५०.अश्मक्रिया,
५१.मृत्क्रिया,
५२.दासक्रिया,
५३.वेणुक्रिया,
५४.चर्मक्रिया,
५५.अम्बरक्रिया,
५६.अदृश्यकिरण,
५७.दन्तिकरण,
५८.मृगयविधी,
५९.वाणिज्य,
६०.पाशुपल्य,
६१.कृषी,
६२.आसवकर्म,
६३.लावकुक्कुट मेषादियुद्दकारक कौशल.
६४.?????

सध्यातरी फक्त कलांची यादी आहे अर्थ समजताच तेसुद्धा दर्शविन्यात येतील.
वरील यादीत जर चुका असतील कृपया दुरुस्त करण्यास आपल्या सुचना देऊन मदत करावी...

This page is powered by Blogger. Isn't yours?